30+ Books
Publications
Achievements
4 awarded · 6 registered

डॉ. प्रशांत विघे यांची शिक्षक मतदारसंघात उमेदवारी का ?

सप्रेम नमस्कार !

शिक्षक मतदारसंघ हा केवळ शिक्षकांसाठी राखीव आहे. हा मतदारसंघ सुज्ञ, विवेकी आणि अभ्यासू आहे. मात्र मागील दीड दशकाचा आढावा घेतला असता, शिक्षण क्षेत्राची विदारक परिस्थिती आणि भ्रष्टाचार यामुळे शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित आहेत.

भविष्यात गतकाळातील चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपल्यालाच निर्धारपूर्वक विवेकी पावले उचलावी लागतील. याकरिता आपण आपला असा शिक्षक प्रतिनिधी निवडावा, जो आपल्या क्षेत्राशी प्रामाणिक राहून सर्वसमावेशक शैक्षणिक ध्येयधोरणे ठरवेल आणि अन्याय व भ्रष्टाचाराविरुद्ध खंबीरपणे उभा राहील!

आगामी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीतील उमेदवार म्हणून, मी माझ्या शिक्षण, संशोधन व सामाजिक कार्याचा आढावा आपल्यासमोर ठेवत आहे. जर मी आपल्या निकषांवर खरा उतरत असेल, तरच मला आपला प्रतिनिधी म्हणून कौल द्यावा! धन्यवाद!

प्रा. डॉ. प्रशांत विघे

Vision & Mission

Vision (दृष्टिकोन)

भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि शिक्षक-केंद्रित शिक्षणव्यवस्था उभी करणे. शिक्षकांचा सन्मान, त्यांच्या न्यायहक्कांचे संरक्षण, NEP च्या अंमलबजावणीतील विसंगती दूर करणे, आणि प्रत्येक स्तरावर गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक शिक्षण व्यवस्था निर्माण करणे हा माझा मुख्य उद्देश आहे.

Mission (ध्येय)

शिक्षकांचे हक्क, वेतन, सेवाशर्ती, पदोन्नती, सेवानिवृत्ती लाभ, जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्स्थापना, आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ठोस कृती हे सातत्याने पुढे नेणे. मी आतापर्यंत जसे १०००+ प्रकरणे कोणत्याही आर्थिक व्यवहाराशिवाय न्यायाने मार्गी लावली, तसेच हे काम अधिक व्यापकपणे सुरू ठेवण्याचा संकल्प आहे.

शिक्षण सुधारणा

NEP ची अंमलबजावणी शिक्षकांच्या हिताला बाधा न आणता व्हावी, राज्यातील उच्चशिक्षणातील विसंगती दूर करणे, संशोधन केंद्रांना मान्यता पुनर्स्थापित करणे आणि अभ्यासक्रम दर्जेदार ठेवणे.

शिक्षकांचे हक्क

योग्य वेतन, वेळेवर पदोन्नती, भरतीत पारदर्शक प्रक्रिया, DCPS–NPS मधील प्रलंबित प्रश्नांचे निराकरण आणि जुनी पेन्शन योजनेच्या पुनर्स्थापनेसाठी सातत्यपूर्ण लढा.

पारदर्शक प्रशासन

सहसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचार समाप्त करणे, अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई, बदल्या–नियुक्ती प्रक्रियेत पारदर्शकता आणि डिजिटल प्रशासन मजबूत करणे.

सामाजिक भान व जनसेवा

NSS उपक्रम, पर्यावरण जागरूकता, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, वंचित गटांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्यपूर्ण कृती.

Anthem
      ( चाल: काठी नं घोंगडं घिऊ घा की रं, मला बी जत्रेला यिऊ द्या की रं )

जुनी पेन्शन लागू करा की रं
शिक्षकानं ज्ञान पेरलं की रं,
अंधारातून जग उभं केलं की रं!
आता त्याची हाय घेऊ नका की रं,
वृद्धापकाळ त्याचा विसरू नका की रं!
सेवेचा मान जपू द्या की रं,
शिक्षका सन्माना जगू द्या की रं!
प्रा. डॉ. प्रशांत विघे म्हणती एकच हाक की रं,
जुनी पेन्शन लागू करा की रं,
हक्क आमुचा देऊन टाका की रं!

शाळा उभारल्या आम्ही की रं,
विद्यार्थी झाले अधिकारी की रं!
त्यांच्या यशात आमचा घाम की रं,
अन हेळसांड आमची कशी काय की रं!
वृद्धापकाळात विसरू नका की रं,
सेवेचा सन्मान ठेवा की रं!
शिक्षका सन्माना जगू द्या की रं,
प्रा. डॉ. प्रशांत विघे यांचा नारा घ्या की रं,
जुनी पेन्शन लागू करा की रं!

जसा आदर आई वडिलांचा कि रं,
तोच सन्मान गुरुजनांचा कि रं!
वयोमानाची लढाई सुरु झाली रं,
आर्थिक चणचण आली की रं!
सरकार, आता जागं व्हा की रं,
हक्काचं जगणं राहू द्या की रं!
प्रा. डॉ. प्रशांत विघे सांगती मनापासून की रं,
शिक्षका सन्माना जगू द्या की रं,
जुनी पेन्शन लागू करा की रं!

            

पुस्तके आणि प्रकाशने (Books & Publications)

१५

संदर्भ ग्रंथ

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये संदर्भासाठी वापर

३२

क्रमिक व संपादित पुस्तके

विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर अद्ययावत अभ्यास साहित्य

८५+

शोधनिबंध

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन लेख प्रकाशित

संशोधन मार्गदर्शक (Ph.D. Guide)

आतापर्यंत ४ विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आचार्य (Ph.D.) पदवी यशस्वीपणे पूर्ण केली असून, ८ विद्यार्थी सध्या संशोधन करत आहेत. तसेच त्यांनी ४८ शोध प्रबंधांचे मूल्यांकन केले आहे.

पुस्तकांची संपूर्ण यादी (Full List of Authored & Edited Books)

  • भारतीय संविधानातील मूलभूत अधिकार आणि कर्तव्य — Devyani Prakashan (2009)
  • वि.रा.शिंदे यांच्या सामाजिक व राजकीय चळवळी — Sahitya Prasar Kendra (2010)
  • महाराष्ट्रातील पंचायतराज वाटचाल — Ved Mudra Prakashan (2012)
  • भारतीय संविधानातील तरतुदी आणि स्थानिक स्वशासन भाग-1 — Sri Sainath Prakashan (2017)
  • नक्षलवादी चळवळीचा उदय आणि विकासाची पार्श्वभूमी — Sahitya Prasar
  • भारतीय शासन व्यवस्था भाग 1 — Sri Sainath Prakashan (2017)
  • इंग्लंड अमेरिकेचे संविधान आणि सार्वत्रिक परिषद — Sri Sainath Prakashan (2018)
  • चीन व संयुक्त राष्ट्र — Sri Sainath Prakashan (2018)
  • निवडक देशांचे संविधान आणि आंतरराष्ट्रीय संघटना — Sri Sainath Prakashan (2018/19)
  • लोकशाहीवादी निवडणुक प्रक्रिया आणि सुशासन — Sri Sainath Prakashan (2020)
  • भारतीय शासन आणि राजकारण — Sri Sainath Prakashan (2024)
  • ओळख राज्यशास्त्राची — Sri Sainath Prakashan (2024)
  • भारतीय संविधानाची मुलतत्वे — Sri Sainath Prakashan (2024)
  • नक्षलवाद — Sri Sainath Prakashan (2024)
  • उद्देशपत्रिका (ओळख भारतीय संविधान) — Sri Sainath Prakashan (2024)
  • भारतीय निवडणुक प्रक्रिया आणि व्यवस्थापन — Sri Sainath Prakashan (2024)
  • निवडक संविधान आणि संयुक्त राष्ट्र (वस्तुनिष्ठ प्रश्न) — Sri Sainath Prakashan (2019)
  • आधुनिक राजकीय संकल्पना आणि धोरण — Sri Sainath Prakashan (2019)
  • पश्चिमात्य आणि भारतीय विचारवंत संकल्पना — Sri Sainath Prakashan (2020)
  • पंचायत राज व्यवस्था — Sri Sainath Prakashan (2020)
  • मानव अधिकार आणि भारतीय संविधानातील तरतुदी — Sri Sainath Prakashan (2020)
  • मॉडेल Indian Polity — Sri Sainath Prakashan (2020)
  • भारतीय संविधानातील तरतुदी आणि स्थानिक स्वशासन भाग-2 — Sri Sainath Prakashan (2021)
  • भारतीय राजकीय व्यवस्था - भाग 1 — Sri Sainath Prakashan (2021)
  • राजकीय व्यवस्था - भाग 2 — Sri Sainath Prakashan (2022)
  • तुलनात्मक शासन आणि राजकारण — Sri Sainath Prakashan (2023)

Leadership Journey

From Teacher to Reformer
2009 – present

Started teaching at B.S. Patil Mahavidyalaya (2009–2019), then moved to Bharatiya Mahavidyalaya, Amravati. Active in teacher unions and university bodies.

Senate & Board Leadership
2022 – present

Elected to University Senate and Board of Studies — raised questions on appointments, recoveries and pending cases.

Campaign for OPS
2015 – 2024

Leading state-level movements & hunger strikes to reinstate the Old Pension Scheme for teachers and staff.

Key Actions & Achievements

30+

Books Published / पुस्तके

37

Research Papers / संशोधन लेख

65+

Guest Lectures / व्याख्याने

1000+

Cases Resolved / प्रकरणे मार्गी लावली

Join The Movement

Contact Details

Office

Department of Political Science,
Bharatiya Mahavidyalaya, Amravati

Phone

+91 9326877749

Email

bmvpolitical@gmail.com

Send a Message